Happiness Curriculum आनंददायी अभ्यासक्रम
महात्मा गांधीजीनी शरीर, मन आणि आत्मा याच्या विकासास शिक्षण म्हंटले आहे. त्यांच्या विचार प्रणालीनुसार संपूर्ण व्यक्तिमत्व विकासातून माणूस घडविणे, निसर्गवाद, आदर्शवाद, अध्यात्मवाद व कार्यवाद याच्या समन्वयातून कृतीद्वारे शिक्षण देण्यास प्राधान्य दिले आहे. शिक्षणातून स्वावलंबी जीवन, शिक्षणास व्यवहाराची जोड मिळावी यासाठी मुलउदयोगी शिक्षणाची त्यांनी संकल्पना मांडली. त्यालाच त्यांनी बुनियादी शिक्षा, नयी तालीम असे जीवन शिक्षण म्हणून ओळख दिली. त्यांची ही शिक्षण पद्धती जीवनाभिमुख होती व ती स्वावलंबन, स्वाभिमान, श्रमप्रतिष्ठा या तीन सूत्रावर आधारीत होती. त्यामधून विद्यार्थी आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या आदर्श नागरिक घडावेत ही अपेक्षा होती. कृतीद्वारे शिक्षण, स्वानुभावातून शिक्षण, व्यवसायिक शिक्षण, गरजाधीष्ठीत शिक्षण, समन्वयातून शिक्षण देण्यासाठी विविध स्तरानुसार विद्यार्थ्यांना विविध अध्यापन पद्धतीचा वापर करून शिकवले जात असत.
मुलउदयोगी शिक्षणाची संकल्पना ३h च्या विकासावर आधारीत आहे. h heart, h-hand, h-head यातून शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक विकाससाध्य व्हावा हे अभिप्रेत असून त्यातून आदर्श चारित्र्य निर्माण करणे हे उद्दिष्ट होते. महात्मा गांधीजीकडून भारताच्या शिक्षण प्रणालीला मिळालेली मुलउदयोगी शिक्षण ही मौलिक भेट आहे. अलीकडच्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण शाळेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. जागतिक स्तरावरूनही शिक्षणामध्ये मोठ्याप्रमाणात अमुलाग्र बदल घडत आहेत. शाळेमध्ये वातावरण हे प्रसन्न असावे. विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे वाटणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शनिवारी तसेच रविवारीदेखील शाळेत यावेसे वाटले पाहिजे. मुलांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव येत राहणे गरजेचे आहे. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवणे गरजेचे आहे.शिक्षणातून प्रामाणिक आणि जबाबदार मानव तयार करण्याची काम शिक्षण व्यवस्थेस करावे लागणार आहे. Happiness Curriculum हे या दिशेने पहिले पाऊल आहे. त्यामाध्यमातून आपण शिक्षण व्यवस्थेला सर्वांगीण सक्षम बनवू शकू, मानवतेचा विकास करू शकू असे शासनास वाटते. संकोच न करता विद्यार्थी न घाबरता प्रश्न विचारण्यास उत्सुक असली पहिजेत. राज्यातील सर्व मुलांना शिक्षणातून आनंदही मिळाला पाहिजे.
सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक हिंसात्मक घटना, आत्महत्येचे प्रसंग अवतीभवती घडताना दिसतात. तसेच कोरोना संकटामुळे सुद्धा गेल्या काही वर्षात मानसिक स्वास्थ्य टिकविणे हे विद्यार्थ्यांपुढे मोठे आव्हान आहे. विविध शिक्षण समित्या व आयोग यांनी शिक्षणातून शांतता, सौहार्द आणि सुसंवाद या मूल्यांच्या विकासावर भर दिला आहे. शिवाय तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सहानुभूती, इतरांसाठी सन्मानाची भावना, स्वच्छता, शिष्टाचार, सेवाभाव, समानता, न्याय, सामाजिक कर्तव्य व जबाबदाऱ्या यांची जाणीव यासारखी नैतिक, मानवी, संवैधानिक मूल्य रुजवणे या बाबींवर सुद्धा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शालेय स्तरावर आनंददायी कृतींचा समावेश असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. सध्या “Happiness Curriculum" ही संकल्पना जगातील अनेक देशांनी स्वीकारलेली आहे. तसेच
राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये मागील शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शिक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शिक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये सजगता, कथा, कृती, अभिव्यक्ती या बाबींचा विचार करण्यात आलेला आहे. सदर आनंददायी शिक्षण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून अध्ययनाविषयी त्यांची रुची वाढल्याचे निदर्शनास येत आहे. सदर आनंददायी कृती महाराष्ट्र राज्यात इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविल्यास
Post a Comment