NMMS EXAM इतिहास सराव प्रश्नपत्रिका
जि.प.प्रा.शाळा थडीउक्कडगाव ता. सोनपेठ जि.परभणी
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा
NMMS Exam सराव प्रश्नसंच शालेय क्षमता चाचणी
विषय:-इतिहास
अंदमान येथील सेल्युलर जेल इतिहासाच्या कोणत्या साधनात येते ?
1) लिखीत साधने 2) भौतिक साधने 3) मौखिक साधने 4) दृकश्राव्य साधने
वर्धा येथील सेवाग्रामला भेट दिल्यावर कोणाच्या युगाची माहिती मिळते ?
1) टिळक युग 2) आधुनिक युग 3) गांधीयुग 4)जहाल युग
आत्मचरित्र इतिहासाच्या कोणत्या साधनात येते ?
1)लिखित साधने 2)भौतिक साधने 3)मौखिक साधने 4)दृकश्राव्य साधने
निबंधमाला हे मासिक कोण चालवत असत ?
1)गोपाळ हरी देशमुख 2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3)विष्णुशास्त्री चिपळूणकर 4)महात्मा गांधी
सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे?
1)अंदमान 2) निकोबार 3)मुंबई 4) पुणे
मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
1)गोपाळ हरी देशमुख 2)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3)न्यायमूर्ती रानडे 4) महात्मा गांधी
7) दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात?
1)ताम्रपट 2) चैत्य 3)विहार 4)शिलालेख
8) कोणत्या ठिकाणी असलेल्या आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणांस महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पहावयास मिळतात?
1)साबरमती 2)कोलकाता 3) पुणे 4)मुंबई
9) जनगणमन या आपल्या राष्ट्रगीताचे निर्माते कोण ?
1)सुभाषचंद्र बोस 2)लोकमान्य टिळक 3)गोपाळ गणेश आगरकर 4) रवींद्रनाथ टागोर
10) खालीलपैकी लिखित साधन कोणते आहे?
1)वृत्तपत्रे 2)ग्रंथ, चरित्रे 3)फॅक्टरी रेकोर्ड 4)सर्व बरोबर
11)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली ‘बहिष्कृत भारत’ हे पत्र सुरु केले?
1)1925 2)1930 3) 1922 4)1927
12)लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यांतून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले?
1)प्रभाकर 2) निबंधमाला 3) दीनबंधू 4) जनता
13) खालीलपैकी कोणी इस 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली ?
1)रवींद्रनाथ टागोर 2)दादासाहेब फाळके 3)दादासाहेब मेरठ 4)महात्मा गांधी
14) स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, ओव्या, लोककथा, मेळे, जलसे, कलापथके, मुलाखती, प्रसंगवर्णने ही कोणती साधने आहेत?
1)मौखिक साधने 2) मध्ययुगीन साधने 3) भौतिक साधने 4)लिखित साधने
15) आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक् स्वरूपाची साधने कोणती आहेत?
1)छायाचित्रे 2)ध्वनिमुद्रण 3) चित्रपट 4)पोवाडे
16)इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने कोणती आहेत?
शिलालेख 2) छायाचित्रे 3) चित्रपट 4) पोवाडे
17) प्रबोधन युगाचा कालखंड खालीलपैकी कोणता संबोधला जातो ?
1) इ.स.13 ते 16 वे शतक 2) इ.स.10 ते 13 वे शतक 3)इ.स.16ते 20 वे शतक 4)वरील सर्व
18) प्रबोधनयुगात युरोपात धर्माऐवजी …………….. हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.
1) माणूस 2)झाड 3)प्राणी 4) पाणी
19)मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती कोणाशी संबंधित आहे ?
1)वास्को द गामा 2)बर्थोलोमेव डायस 3)नेपोलियन बोनापार्ट 4)लिओनार्दो द विंची
20)शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र, चित्रकला यांसारख्या विविध विषयांवर प्रभुत्व कोणाचे होते?
1)जोहान्स गुटेनबर्ग 2)बार्थोलोम्यू डायस 3)ख्रिस्तोफर कोलंबस 4)लिओनार्दो-द-विंची
21) इसवी सन 1450 च्या सुमारास कोणी छपाई यंत्राचा शोध लावला ?
कोलंबस 2)जोहान्स गुटेनबर्ग 3)अल्वा एडिसन 4)यापैकी नाही
22)कशाच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहचू लागले?
1)भौगोलिक 2)छपाई यंत्र 3)वाफेचे इंजिन 4)कापड यंत्र
23) लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. या विरोधात युरोपात सुरू झालेल्या चळवळीला काय म्हणतात?
‘रोमन चळवळ’ 2) ख्रिस्ती चळवळ’ 3)‘भौगोलिक चळवळ’ 4)‘धर्मसुधारणा चळवळ’
24) इ.स.1453 मध्ये कोणी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले?
ऑटोमन तुर्कांनी 2)ब्रिटिशांनी 3)डचांनी 4)पोर्तुगीजांनी
25) 1453 पर्यंत कोणत्या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात?
लंडन 2)मॉस्को 3)गियाना 4)कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल)
26) कितव्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले?
पंधराव्या 2)चौदाव्या 3)सोळाव्या 4)सतराव्या
27) इ.स.1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला कोणता पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहचला?
1)जोहान्स गुटेनबर्ग 2)बार्थोलोम्यू डायस 3)ख्रिस्तोफर कोलंबस 4)लिओनार्दो-द-विंची
28) इ.स.1498 मध्ये कोणता पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहचला?
1)जोहान्स गुटेनबर्ग 2)बार्थोलोम्यू डायस 3)ख्रिस्तोफर कोलंबस 4)वास्को- द-गामा
29) इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टी वर किती वसाहती स्थापन केल्या?
1)तेरा 2)पंधरा 3)सोळा 4)सतरा
30) कोणत्या वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला?
1)अमेरिकन 2)फ्रेंच 3)ब्रिटन 4)भारतीय
31) कोणत्या साली फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला?
1)इ. स. 1853 2)इ. स. 1889 3)इ. स. 1753 4)इ. स. 1789
32) कोणत्या राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली?
1)अमेरिकन 2)फ्रेंच 3) ब्रिटन 4)भारतीय
33) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कोठे झाला?
1)अमेरिकन 2) फ्रेंच 3)ब्रिटन 4)भारतीय
34) कोणत्या देशाचे वर्णन ‘जगाचा कारखाना’ असे केले जाऊ लागले?
1)फ्रेंच 2)अमेरिकन 3)भारतीय 4)ब्रिटन
35) एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे.......स्थापन करणे होय.
लष्कर 2)वसाहत 3)राजवट 4)वर्चस्व
36) विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच ....................... होय.
1)साम्राज्यवाद 2)वसाहत 3)राजवट 4)वर्चस्व
37) इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या साली केली होती?
1)इ. स. 1510 2)इ. स. 1610 3)इ. स. 1500 4) इ. स. 1600
38) भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या बादशाहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली होती?
औरंगजेब 2)जहांगीर 3)हुमायून 4)अकबर
39) इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात झालेली तीन युद्धे कोणत्या नावाने ओळखली जातात?
1)‘कर्नाटक युद्धे’ 2)‘म्हैसूरचे युद्धे’ 3)‘महाराष्ट्राचे युद्धे’ 4)‘पानिपतचे युद्धे’
40) इ.स.1756 साली सिराज उद्दौला हा कोणत्या प्रांताच्या नवाबपदी आला?
1)दिल्ली 2)बंगाल 3)अयोध्या 4)पंजाब
41) कोणी मुत्सद्देगिरीने बंगालच्या नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले?
1)रॉबर्ट क्लाईव्ह 2)कॉर्नओलिस 3)लॉर्ड वेलस्ली 4)लॉर्ड बेटिंग
42)बक्सारच्या लढाईनंतर कोणत्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला?
1)दिल्ली 2)बंगाल 3)अयोध्या 4)अलाहाबाद
43)कोणत्या साली श्रीरंगपट्टणच्या युद्धात अखेर टिपू सुलतान मरण पावला?
1)1798 2)1799 3)1800 4)1805
44) 1774ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात किती युद्ध झाली ?
2 2)3 3)4 4)5
45) 1782 साली कोणता तह होऊन पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले?
1)वसईचा तह 2)सालबाईचा तह 3)तैनाती फौज 4)अलाहाबादचा तह
46)दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणत्या साली केला?
1800 2) 1801 3)1802 4)1805
47) खालील पैकी कोणता करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे ?
1)दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार 2)पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपल
3)पेशवाईचा अस्त झाला 4)सातारचे राज्य खालसा केले.
48) डलहौसीने दत्तकविधान नामंजूर करून कोणत्या साली सातारचे राज्य खालसा केले ?
1845 2)1846 3)1848 4) 1850
49) रॉबर्ट क्लाइव्हने कोणत्या प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
पुणे 2) अयोध्या 3) ओडिशा 4) बंगाल
50) छत्रपती प्रतापसिंह यांनी कोणत्या शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवल ?
कोल्हापूर 2)पुणे 3)सातारा 4) मुंबई
Post a Comment