Science Important Questions|vimp science questions,विज्ञान महत्वपूर्ण प्रश्न

 Science Important Questions|vimp science questions,विज्ञान महत्वपूर्ण प्रश्न 




####

                          विज्ञान प्रश्न 

  1. बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात हे .......उदाहरण आहे.

           1)विराम अवस्थेतील जडत्व       2) गतीचे जडत्व     3) दिशेचे जडत्व         4) दाब 

  1. कोणते विद्युत घट स्मार्टफोन, लॅपटॉप या आधुनिक साधनांमध्ये वापरले जातात?

  1) लेड-आम्ल विद्युतघट     2) कोरडा विद्युतघट   

  3) निकेल-कॅडमिअम घट   4)  लिथिअम (Li) आयन विद्युतघट

  1. .......... याने इलेक्ट्रॉनचा शोध लावला.

  1) जे. जे. थॉमसन     2) नील्स बोर      3) न्यूटन          4) डाल्टन

  1. कोणते संमिश्र (alloy) तांबे व कथिल यांपासून बनवतात?

                1)स्टेनलेस स्टील                  2)पितळ           3) कांस्य           4) ब्राँझ

  1. खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे?

1)ग्रॅफाईट       2) ब्रोमिन           3) सल्फर          4) हिरा 


##########
  1. आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ ......... नावाने ओळखली जाते.

   1) शीतक्रांती          2) रजतक्रांती         3) हरितक्रांती           4) नीलक्रांती

  1. जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीत.... चा वापर होतो.

 1)पास्कल नियम       2)न्यूटन नियम       3)आर्किमिडीज तत्व      4)गुरुत्वाकर्षण तत्व

  1. एकमेकांत न  विरघळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण कोणत्या पद्धतीने वेगळे करता येतील?

 1)अपकेंद्री पद्धत      2)विलगीकरण पद्धत      3)उद्धपातन पद्धत      4)रंजकद्रव्य पृथक्करण पद्धत

  1. पुढीलपैकी धातूचे क्षरण रोखण्यासाठी कोणती पद्धत उचित ठरणार नाही ?

 1)गॅलव्हनायझेशन   2)कल्हई करणे    3)पावडर कोटिंग     4)पाण्यात बुडवून ठेवणे


  1. प्रकाशाच्या  विकिरणास........रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते.

1)लाल              2) निळा         3)हिरवा         4) पिवळा


########
  1. कोणत्या धातूला रॉकेल मध्ये बुडवून ठेवावा लागतो ?

1)पोटॅशियम         2) कॅल्शियम        3) सोडिअम       4) मॅग्नेशियम

  1. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन ...... केंद्रके तयार होतात.

1)युरेनियमची      2)हेलियमची       3)थोरियमची       4)बेरिअमची

  1. अचूक जोडी ओळखा.

1) स्वर नि ---480 Hz     2)स्वर सा ---426 Hz   3)स्वर ग ---256 Hz   4) स्वर ध ---312 Hz

  1. बंकर मध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूची टेहळणी करण्यासाठी..... वापरतात.

1)कॅलिडोस्कोप      2)दुर्बीण      3)सपाट आरसा      4)परिदर्शी

  1. उष्णतेच्या ...... साठी माध्यमाची आवश्यकता नसते.

 1) अभिसरण        2) प्रारण        3)वहन        4) प्रसरण

  1. खालीलपैकी धातूंचे इलेक्ट्रॉन संरूपण कोणते ?

1) (2,8,5)         2)  (2,8,7)        3) (2,8,4)        4) (2,8,1)

  1. फसफसनाऱ्या शितपेयांमध्ये........ आम्ल वापरतात.

1)ऍसिटिक आम्ल     2)कार्बोनिक आम्ल     3)कार्बोलिक आम्ल      4)ऑक्झलिक आम्ल 

  1. एल. पी. जी.या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन घटक असतात त्यांचे प्रमाण ........ हे आहे.

   1)70:30      2) 40:60      3) 30:70        4) 60:40


  1. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात?

1)बायोग्राफी    2)ऑटोग्राफ      3)सेस्मोग्राफ     4)फोटोग्राफ

  1. ध्वनी तरंगाची वारंवारिता.........या एककात मोजली जाते.

#########

1)मीटर       2) हर्ट्झ         3) लिटर         4) कॅलरी

  1.  ‘N’ या कवचाचे इलेक्ट्रॉन धारकता किती असते ?

    1) 2           2) 8          3) 32               4) 18

  1. कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो?

1)युरेनियम 235       2) आयोडीन 131         3) कोबाल्ट 60        4) कार्बन 14

  1. राकेश शर्मा यांनी अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना कोणता संदेश दिला ?

1)मेरा भारत महान                                     2) खरा तो एकच धर्म

3)जय जवान जय किसान जय विज्ञान          4) ‘सारे जहाँसे अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा |

  1. पाणी जंतू विरहित करण्याकरिता...... आम्लाचा वापर होतो.

1)विरल हायड्रोक्लोरिक आम्ल   2)ऍसिटिक आम्ल     3)सल्फ्यूरिक आम्ल    4)नाइट्रिक आम्ल 

  1. आपल्या शरीरातील ....... आम्ल असते. ते आपले आनुवंशिक गुण ठरवते.

1)N.D.A.      2) D.N.A.      3) D.R.I       4) R.N.A.

  1. आपल्या पोटात जास्त प्रमाणात आम्ल झाल्यामुळे अपचन होते या अपचनापासून मुक्त होण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय योग्य ठरेल ?

1)लिंबाचा रस    2) मिल्क ऑफ मॅग्नेशिया    3) आम्लराज         4) व्हिनेगार


  1. .......चा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीजनिर्मितीसाठी होतो.

1)आयोडीन--131      2)सोडियम--24      3) C--14       4)युरेनियम--235

  1. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला .......म्हणतात.

1)नियतकालिक गती     2)आंदोलित गती      3)यादृच्छिक गती       4)रेषीय गती

  1. मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी ....... ध्वनीचा वापर केला जातो.

1)श्राव्यातीत  ध्वनी    2)अवश्राव्य ध्वनी       3) श्राव्य ध्वनी     4) ध्वनी वारंवारिता

  1. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कागद निर्मिती कारखाना आहे ?

1)ठाणे      2) तारापूर        3) बल्लारपूर            4) नागपूर


Post a Comment

Previous Post Next Post